लासूर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

chopada spardha

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील लासूर येथे माळी समाज मंगल कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या १२९ पुण्यतिथी निमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा लासुर कार्यकारिणी यांच्या वतीने इयत्ता ८ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच (दि.२८) तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातून २३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे अध्यक्षस्थानी लासुर ग्राम पंचायतीचे लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे उदघाटन लासुर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय कोळी व पंचायत समिती चोपडा येथील विस्तार अधिकारी कृषी योगिनी महाजन यांनी केले.

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम येण्याचा मान कु.आसावरी किशोर महाजन, प्रताप विद्या मंदिर चोपडा हिने मिळविला असून रु १००१/- रोख बक्षीस व स्मृतीचिन्ह लासुर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भागवत कोळी यांच्या कडून देण्यात आले. व्दितीय क्रमांकाचे बक्षीस कु.कार्तिका विश्वनाथ चौधरी,
पंकज विद्यालय चोपडा हिने पटकावले. तिला रु ७०१/- रोख बक्षीस स्मृतीचिन्ह पंचायत समिती चोपडा येथील विस्तार अधिकारी कृषी योगिनी किशोर महाजन यांचा कडून देण्यात आले. तृतीय क्रमाकांचे बक्षीस कु.किरण राजेंद्र पाटील विवेकानंद विद्यालय चोपडा हिने पटकावले असून रु ५०१/- रोख बक्षीस स्मृतीचिन्ह जिल्हा परिषद मुलाची शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश्वर जयवंत महाजन यांच्याकडून तिला देण्यात आले.

उत्तेजनार्थ बक्षिसात मानसी अनिल पाटील या विद्यार्थीला रु १०१ चे रोख बक्षीस डॉ.भावना राजेंद्र महाजन यांनी तर प्रियंका वासुदेव पाटीलया विद्यार्थीला रु १०१ चे रोख बक्षीस तापी फौंडेशन चे संस्थापक अनिल बाविस्कर यांनी दिले. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण गोसावीसर प्रताप विद्या मंदिर चोपडा, निमगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बाविस्कर, चोपडा येथील गोपाल बडगुजर यांनी केले.यावेळी शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार प्रदर्शन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य खान्देश विभागीय अध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन यांनी केले.

Protected Content