जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टाकळी खुर्द ग्रामपंचायत येथे गिरीश महाजन फाउंडेशन व न्यू रुबी स्टार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर घेण्यात आले यामध्ये गावातील ३२० लोकांनी सहभाग घेतला.
यामध्ये डोळे तपासणी, दंतरोग तपासणी, बीपी शुगर तपासणी व महिलांची सर्व आजार तसेच सामान्य तपासण्या केल्या यामध्ये रुबीस्टार हॉस्पिटलचे सहकार्य लाभले डॉ. धनंजय चौधरी व पंकज पाटील आणि त्यांची टीम यांचे सहकार्य लाभले.
टाकळी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र माळी व उपसरपंच विजय चौरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, अमोल महाजन, शरद मोरे, दीपक बावस्कर, रमेश महाजन व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये गरजू लाभार्थ्यांना रुबीस्टार हॉस्पिटल येथे डोळ्यांचे ऑपरेशन मोफत होणार आहे