सावदा येथे कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू

सावदा प्रतिनिधी । सावदा येथे  आढळून आलेल्या कोरोनाबाधित रूग्णाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सावद्यात एकुण मृतांचा आकडा सात झालाय. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

सावदा कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णाचा अहवाल मंगळवारी २३ जून रोजी पॉझिटीव्ह आला होता. सावद्यात एकुण ३८ रूग्ण कोरोनाबाधित झाले आहे. मंगळवारी आढळून आलेल्या रूग्णाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता एकुण मृतांची संख्यात सात झाली आहे. यापैकी ३ रूग्ण उपचार घेत असून उर्वरित २८ रूग्ण कोरोनामृक्त झाले आहे. यावृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

Protected Content