भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील एका भागात राहणाऱ्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी १६ जुलै रोजी रात्री ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १७ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील एका भागात ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान मंगळवारी १६ जुलै रोजी रात्री ९ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अचानक नाईट गेली. त्यानंतर गावात राहणारा अर्जून अत्रू बैद वय ५२ रा. निंभोरा ता. भुसावळ याने पिडीत मुलीशी अंगलट करून तिचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १७ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अर्जून अत्रू बैद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पालवे हे करीत आहे.