येत्या १० दिवसात दस्तऐवज दाखवून वाहने घेवून जा – पोलिसांचे आवाहन

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या दहा वर्षांपासून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात ७२ दुचाकी वाहने पडून आहे. वाहन मालकांनी येत्या दहा दिवसांत मुळ दस्तऐवज दाखवून वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक यांनी केले आहे.

चाळीसगाव शहरात गेल्या दहा वर्षांपासून अपघात, चोरी व बेवारस वाहने शहर पोलिस ठाण्यात तशीच पडून आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत वाहन मालकांनी मुळ कागदपत्रे दाखवून आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी केले आहे. जर वाहनधारकांनी दहा दिवसांत मालकी हक्क नसल्याचे मुळ दस्तऐवज सादर न केल्यास त्या सर्व वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथून मुल्यांकन करून रितसर लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. यातून मिळालेली रक्कम हि शासनास भरणा करण्यात येणार आहे. वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक व चेसिस नंबर येथील शहर पोलिस ठाण्यात नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहेत. नोटीस बोर्डावर आपापल्या वाहनांची खात्री करूनच मुळ दस्तऐवज सादर करावयाचे आहे. दहा दिवसांची अवधीत मुळ दस्तऐवज सादर करावयाचे आहे.

Protected Content