….त्या सात आमदारांवर कारवाई करा : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची काही मतं फुटल्यामुळं चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला लागला होता. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत फुटलेल्या त्या सात आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप उमेदवार होते. मात्र या निवडणुकीत त्यांना पहिल्या पसंतीची मतंही मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. अंतर्गत वादामुळे काँग्रेसच्या सात आमदारांनी हंडोरे यांना मतदान केलं नसल्याचं समोर आलं आहे. ही बाब महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्या निदर्शनास आणून देत या आमदारांवर कारवाई करावी.” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

याबद्दल बोलतांना, “ही बाब गंभीर असून फुटलेले आमदार कोण आहेत ? याची चौकशी होऊन दखल घ्यायला हवी.” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे काही आमदार उशीरा आले ही बाबही चांगली नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला कळवलं आहे. शिवसेनेत मतभेद होऊन त्याचे पडसाद दिसत असतांना कॉंग्रेसमध्ये तसे घडतेय का? याविषयी राजकीय वर्तुळात तर्क लढविले जात आहेत.

Protected Content