यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा येथे एका शेतकऱ्याचा १५ हजार रुपये किंमतीचा बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील टाकरखेडा येथे उल्हास पुनमचंद चौधरी (वय-४१) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २६फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या बैलजोडीला चारापाणी घालून घरी निघून गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचा १५ हजार रुपये किंमतीचा एक बैल चोरून नेल्याचे पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. त्यांनी बैलाचा इतर परिसरात व शेतात शोध घेतला परंतु त्यांना बैल कुठेही मिळून आला नाही. यासंदर्भात उल्हास चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.