ताजूद्दीन शेख महाराजांनी किर्तनातच घेतला शेवटचा श्‍वास

साक्री प्रतिनिधी | ख्यातनाम  कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे साक्री तालुक्यात जामदे येथे कीर्तन सुरू असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. किर्तन सुरू असतांनाच त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज पारायण सप्ताह निमित्त सातव्या दिवशी सोमवार दि, २७ त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय तन्मयतेने किर्तन करत असतांनाच ताजोद्दीन महाराज यांना हृदय विकाराचा झटका आला. यानंतर स्थानिक मंडळी त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचे निधन झाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

ताजुद्दीन महाराज शेख हे ख्यातनाम किर्तनकार होते. किर्तनातच शेवटचा श्‍वास घेतल्याने त्यांना भाग्याचे मरण आल्याची भावना व्यक्त होत असून हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

 

 

Protected Content