टी-२० : दिपक चहरने हॅटट्रिकसह केली विश्वविक्रमाची नोंद

dipak chahar

 

नागपूर वृत्तसंस्था । भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यासह मालिका जिंकली. चाहरने नागपूरमधील सामन्यात हॅट्ट्रिकसह ६ गडी बाद करून इतिहास रचला.

चहरनं डावाच्या १८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शफीउल इस्लाम याला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. स्लो बाऊंसरवर त्यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं टोलवलेला चेंडू लाँग ऑनवर उभ्या असलेल्या लोकेशच्या हातात जाऊन विसावला. डावाचे अखेरचं षटकही त्यानं टाकलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुस्तफिजुर रहमान याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. त्यानंतर अमिनुल इस्लामला त्रिफळाचित केलं. याचबरोबर त्यानं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

Protected Content