पंचायत समितीसमोर प्रहार अपंग क्रांती संस्थेचे लाक्षणिक उपोषण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी यावल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांनी प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

 

सन २०१८ ते २०२३ या कालावधीत ५ टक्के निधी मिळून मालमत्ता करातून ५० टक्के सूट मिळावी, यासह इतर मागण्या शासन आदेशानुसार त्वरित मंजूर होऊन सुविधा मिळाव्यात व त्यांना पुनर्वसन व विकासाची संधी दयावी अशी निवेदने यावल तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड , पंचायत समिती यावल यांचेकडे  देण्यात आली आहेत. परंतू मागील ५ महिन्या पासून दिव्यांग बांधव शासनाच्या सुविधा मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. परंतू शासन आदेशा नुसार पंचायत समिती यावल कार्यालया कडून कोणतीही कार्यवाही न होता,उदासिनता दाखवली जात असलेने दिव्यांग बांधव शासन सुविधांपासून वंचित रहात असून त्यांना निराशामय जीवन जगावे लागते आहे. व पंचायत समिती यावल कार्यालया कडून शासनाचे दिव्यांग / पुनर्वसन विकास कार्यक्रमास प्रशासनाकडून सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याची संत्पत भावना दिव्यांग बांधव व्यक्त करीत आहे. मागील सुमारे ५ महिन्या पासून दिव्यांगाचे निवेदनाचे कमीत कमी उत्तर देणेचेही पंचायत समिती कडून सौजन्य दाखवणेत आले नाही. हि अत्यंत खेदाची बाब आहे.

 

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडून लेखी आदेशानुसार यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगांचे शासन निर्णया नुसार सर्वेक्षण करून ५% निधी वितरीत करणेची कार्यवाही करून २० दिवसात अहवाल पाठवावा असे आदेश पंचायत समिती यावलकडे येवून देखील त्याची गटविकास अधिकाऱ्यांकडून काही एक दखल न घेता सदर आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

 

त्यामुळे पंचायत समितीच्या भोंगळवदुर्लक्षीत कारभारामुळे मागील ५ महिन्यापासून मागणी करित असलेले मागण्या त्वरित मंजुरी होऊन सुविधा मिळणे साठी लोकशाहीच्या मार्गाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुक्याचे वतीने उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती अध्यक्ष अनिल  चौधरी,शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष गोकुळ कोळी प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे प्रहार चे शहर अध्यक्ष तुकाराम बारी ,माजी नगराध्यक्ष अभिमन्यू विश्वनाथ चौधरी ( उर्फ हेन्द्री ) प्रहार सेवक मनोज करणकर यांचे प्रमुख उपस्थितीत प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा उपाध्यक्ष  दिनेश सैमीरे यांच्या नेतृवाखाली १५ ऑगस्ट या स्वातंत्र दिनी यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर प्रहार अपंग क्रांती संस्था,महाराष्ट्र राज्यच्या यावल शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव एक दिवसाचे लाक्षणीक उपोषणास बसले असुन ,या उपोषणात मोठया संख्येत दिव्यांग बांधवांचा सहभागी झाले असल्याचे दिसुन येत आहे.

Protected Content