फैजपुर येथे जागतिक युवा कौशल्य विकासदिन साजरा

dananaji

फैजपूर प्रतिनिधी । येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज (दि.१५ जुलै) धनाजी नाना महाविद्यालयात कार्यक्रमाच्या आयोजन रसायनशास्त्र विभागातर्फे करण्यात आला होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व प्रमुख अतिथींचा परिचय उपप्राचार्य प्रा.डी.बी.तायडे यांनी करुन दिला. ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता ‘या विषयावर मार्गदर्शना प्रसंगी संचालक जितेंद्र पवार, दत्त ठिंबक यांनी उद्योग क्षेत्रातील विविध कौशल्य कसे दडलेले असतात ते ओळखून त्यांचा विकास करता आला पाहिजे. उद्योजकाजवळ अनेक कौशल्य असावे लागतात ते कोणकोणते यांचा परिचय विद्यार्थांना करुन दिला. उपस्थितांमधून भविष्यात अनेक उद्योजक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  डॉ. सचिन जोशी सीईओ मृदा केअर ऑरगेनिक फर्टिलायझर ॲड कन्सलटन्सी, बडोदा यांनी जैवतंत्रज्ञानाची शास्त्रीय माहिती सांगून जैविक शेती ही काळाची गरज कशी आहे. याबद्दल विविध उदाहरणे विद्यार्थांसमोर प्रभावीपणे मांडले. अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य ए.जी.सरोदे यांनी लघू उद्योग स्वतःसुरू करण्याचे आवाहन श्रोत्यांना केले आहे. अध्यक्षपदी उपप्राचार्य प्रा.ए.जी.सरोदे, प्रमुख अतिथी जितेंद्र पवार, डॉ. सचिन जोशी यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content