वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी.बी. बारेला यांची नगर येथे बदली

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल ग्रामीण रुग्णालयातील कथित कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी.बी. बारेला यांची तडकाफडकी नगर येथे बदली करण्यात आली आहे.

रावेर पासुन सुरू झालेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार यावलला आल्यावर कोटयावधी रूपयांवर पहोचला तरी देखील कुठलीही कार्यवाही नाही येथील यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक पदावर कार्यरत असलेले डॉ बी बी बारेला यांची अडीच वर्षाच्या गोंधळलेल्या कार्यभारानंतर कोरोना संसर्ग काळातील कोटयावधी रुपयांच्या भ्रष्टाचारात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांच्या सोबत नाव आल्याने त्यांची तडकाफडकी नगर येथे बदली करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत असे की, यावल येथील ग्रामीण रुग्णालयात मागील तीन वर्षापासुन वैद्यकीय या पदावर कार्यरत असलेले डॉ बी बी बारेला यांचे नांव जळगाव जिल्हातील झालेल्या कोटयावधी रूपयांच्या कथित आरोग्य साहीत्य घोटाळ्यात नांव आल्याने त्यांची तात्काळ यावल हुन थेट अहमदनगर येथे बदली करण्यात आली असुन, डॉ.बी.बी बारेला हे रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असतांना देखील जवळपास पन्नास लाख रूपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणात पुढे काय झाले ते कडु शकले नाही मात्र मागील आठवड्यात झालेल्या १०ते १२ कोटींच्या भ्रष्टाचारात डॉ.बी.बी.बारेला यांचा नांव आल्याने पुनश्च रावेरच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चर्चा होवु लागली आहे.

अशा प्रकारे कोरोना संसर्गा सारख्या गंभीर विषयात विविध वस्तु खरेदीच्या कोटयावधी रुपयांचे घोटाळे करायचे व प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय हस्तक्षेप करून आपली बदली करून घ्याची असाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content