जळगावात महाराष्ट्रातील पहिले आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे महाराष्ट्रातील पहिले आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर आज (दि.८) संपन्न  झाले. त्याचबरोबर भाजपा कार्यालय वसंत स्मृती जळगाव येथे ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 12 या वेळेत ही अभियान राबवले जाणार आहे.

या शिबिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत 20 कोटीचे पॅकेज जाहिर केले आहे. या माध्यमातुन शेती व शेती पुरक व्यवसाय, लघु उद्योग, महिला व युवा उद्योजकांसाठी विशेषतः आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ समाजातिल प्रत्येक गरजू व्यक्तीला घेता यावा व आत्मनिर्भर योजने बद्दल अधिक माहिती सर्वसामान्य जनते पर्यत मिळावी याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री. विक्रांत दादा पाटील यांच्या आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र या अभिनव उपक्रमा अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे राबवण्यात आलेल्या शिबिरात 200 हून अधिक महिलांना व अनेक युवकांना कोणत्या योजनेचा लाभ कसा घेता येईल त्याकरिता काय कराव लागेल याबद्दल आत्मनिर्भर जिल्हा संयोजक महेश राठी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी महिला उद्योगकरिता (WEP) महिला सक्षिमिकरन योजने अंतर्गत बचत गटा करिता 10 लाखा पर्यंत कर्जा वर 15% ते 50% सबसीडी मिळनार आहे त्याकरिता ईच्छुक 35 महिला गट नोदणी तसेच नवउद्योजकांना करिता (PMEGP) प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ज्यामध्ये नवउद्योजकांना आर्थिक सवलत 25% ते 35% सबसीडी मिळेल त्याकरिता युवकांच्या 11 नोंदी करण्यात आल्या. नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अश्वासन भा.ज.यु.मो. जिल्हा महानगर तर्फे करण्यात आले.

जळगाव शहर आमदार तथा भाजपा ग्रामीन जिल्हा अध्यक्ष राजु मामा भोळे व भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक जी सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आत्मनिर्भर केंद्र प्रदेश संयोजक हर्शल जी विभंडीक, विभागीय प्रदेश संयोजक विजय जी बनछोडे, प्रदेश सहसंयोजक किरण जी बोराडे यांच्या सूचने नुसार भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे शहरात प्रभाग निहाय आत्मनिर्भर मार्गदर्शन शिबिर राबवन्यात येणार आहे असे पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

यावेळी भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे नगरसेवक राजू मराठे, नवनाथ दारकुंडे, भाजयुमो सरचिटणीस अक्षय जेजुरकर ,आत्मनिर्भर भारत जिल्हा महानगर संयोजक महेश लाठी, सहसंयोजक जयंत चव्हाण, उपाध्यक्ष स्वामी पोतदार मंडल ,अध्यक्ष रमेश जोगी,  भाजयुमो अध्यक्ष दिनेश पुरोहित, ज्योतिताई राजपूत ,लता बाविस्कर, उत्कर्ष शिंदे, विनय चौधरी, राजू शिंपी, शुभम जाधव ,सिद्धार्थ भोसले , संजू शिंपी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपा कार्यालय वसंत स्मृती जळगाव येथे ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 12 या वेळेत ही अभियान राबवले जाणार आहे.

 

Protected Content