प्रसिद्ध सैलानी येथे सांकेतिक होळी संपन्न.

बुलढाणा, अमोल सराफ | जिल्ह्याच्या ऐतिहासिक पारंपारिक सैलानी येथे आज सांकेतिक होळी संपन्न झाली. कोरोनाच्या पार्शवभूमीवर सार्वजनिक होळी दहनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरीही मोठ्या संख्येत भाविक सैलानी दाखल झाले होते

कोरोना महामारी मुळे सलग तिसऱ्या वर्षी सैलानी बाबाची यात्रा जिल्हा प्रशासनाने स्थगित केली आहे. या यात्रेत होळी दहन तसेच संदल हे दोन मुख्य कार्यक्रम होत असतात. आज होळी दहन होणार आहे म्हणून प्रशासनाच्या आव्हानाला न जुमानता भाविक आठ ते दहा किलोमीटर पायी चालून सैलानीत दाखल झाले होते.

बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे. देशभरातून सर्वधर्मीय भाविक सैलानीत येतात. कोरोणामुळे यावर्षीही जिल्हा प्रशासनाने सैलानी यात्रा स्थगित केली आहे. सैलानी येथे नारळाची होळी जाळली जाते. परंतु यंदा सार्वजनिक होळी दहन न होता फक्त मुजावर परिवारनी आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी सांकेतिक होळी दहन केले. सैलानीला भाविकांनी येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने सैलानीकडे येणाऱ्या सर्व मार्गावर नाकाबंदी केली आहे. तरीही भाविक आपले वाहन उभे करून आठ ते दहा किलोमीटर पायी चालून सैलानीत दाखल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

 

यातील सैलानी येथील होळी आणि त्यानंतर निघाला संदल हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. दोन वर्षामुळे कोरोना पार्श्वभूमीवर आणि सलग यावर्षी देखील  निर्बंधामुळे सैलानी यात्रा रद्द करण्यात आली आहे. उंटावरून निघणारा संदल आजी सर्वत्र पाहण्याकरिता संपूर्ण देशातून भाविक सैलानी दाखल होत असतात तब्बल आठ ते दहा लाख भाविक सैलानी यादरम्यान येतात. होळीमध्ये केले जाणारे असंख्य नारळाची होळी ही देखील इथे प्रसिद्ध आहे.

Protected Content