Home राजकीय भावनगर येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तलवार डान्स’

भावनगर येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘तलवार डान्स’

0
100

smriti irani1

 

गांधीनगर वृत्तसंस्था । सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा तलवार डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये स्वामी नारायण गुरुकूल येथे मूर्ती स्थापना महोत्सव सुरु आहे. या दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हातात तलवार घेत तलवार नृत्य केले आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ भाजप कार्यकर्त्याने ट्विट केला. यामध्ये स्मृती इराणी काही विद्यार्थिनींसोबत तलवार डान्स करताना दिसत आहेत.

भावनगरच्या स्वामी नारायण गुरुकूलमध्ये मूर्ती स्थापना महोत्सव सुरु आहे. हा महोत्सव येत्या 21 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या दरम्यान, महोत्सवात दररोज वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. शुक्रवारी (16 नोव्हेंबर) या महोत्सवात महिलासांठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये गुजरातचे भाजपा प्रदेश अध्यक्ष जीतू वाघाणी यांच्या विनंतीवर स्मृती इराणी यांनी विद्यार्थिनींसोबत तलवार नृत्य केलं.


Protected Content

Play sound