महानिर्मितीचे स्वप्निल पाटील यांना ‘विश्वकर्मा पुरस्कार’ बहाल

दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर येथे कार्यरत असलेले स्वप्निल सुभाष पाटील यांना २६ जानेवारी रोजी २०२५ रोजी, भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, महानिर्मितीचा प्रतिष्ठित ‘विश्वकर्मा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासोबत रोख रक्कम ५ हजार रुपये देऊन महाजनेकोचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या हस्ते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

या सन्मानप्रसंगी महाजनेकोचे उपमुख्य अभियंता सोनकुसरे, उपमुख्य अभियंता कुंभार तसेच महानिर्मितीच्या इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. पाटील यांच्या कामातील निष्ठा, गुणवत्ता आणि योगदान यांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

स्वप्निल पाटील हे महानिर्मितीच्या लेखा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी दिवंगत सुभाष विष्णू पाटील यांचे सुपुत्र आहेत. तसेच, महाजनकोमध्ये कार्यरत मिलिंद पाटील यांचे ते धाकटे बंधू आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे कुटुंबीयांबरोबरच महानिर्मिती परिवारातही आनंदाची लाट उसळली आहे. स्वप्निल पाटील यांच्या सन्मानामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महानिर्मितीच्या क्षेत्रातील हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची पोचपावती आहे, असेही यावेळी उपस्थित अधिकारी आणि सहकाऱ्यांनी नमूद केले.

Protected Content