गांजा विक्री करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मायकादेखी मंदीराजवळ गांजाची चोरटी विक्री करणाऱ्या संशयिताला शनीपेठ पोलीसांनी कारवाई करत मुद्देमालासह अटक केली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मायकादेवी मंदीर परिसरात एकजण अवैधरित्या गांजाची चोरीटी विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता मायकादेवी येथे कारवाई करत संशयित आरोपी विनोद भिमराव शिंदे वय ४९ रा. वर्डी ता. चोपडा जि.जळगाव याला ताब्यात घेतले त्यांच्याकडून २४ हजार ९६८ रूपये किंमतीचे ३ किलो १२१ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री १० वाजता संशयित आरोपी विनोद भिमराव शिंदे याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.

Protected Content