जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव बसस्थानक आवारात महिलांची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. यावेळी जागरूक प्रवाशांनी संशयित तरूणाला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
जळगाव बसस्थानकावर बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक युवक संशयास्पद अवस्थेत फिरत होता. भाऊबीज निमित्ताने अनेक स्त्रिया परतीचा प्रवासासाठी जळगाव बसस्थानक आवारात आलेले होते. असे असतांना गर्दीचा फायदा घेत एक संशयित तरूण हा महिलांच्या अंगाला स्पर्श करत असल्याचे दिसून आले. यावेळी प्रवास करणाऱ्यांनी एसटी कर्मचारी व सुरक्षा अधिकारी साळुंखे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानुसार यावेळी काही प्रवाशांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.त्यानुसार पोलीस कर्मचारी बसस्थानक आवारात येवून संशयित तरूणाला ताब्यात घेतले आहे. यावेळी प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती.