जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात गावठी पिस्तूल आणि मॅगझीन घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून ३२ हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नमीर आसीफ खान वय १९ रा. काट्या फाईल, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात संशयित आरोपी नमीर आसीफ खान हा तरूण अवैधपणे गावठी पिस्तूल व मॅगझीन घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत संशयित आरोपी नमीर आसीफ खान वय १९ रा. काट्या फाईल, जळगाव याला अटक केली. त्यांच्याकडून ३२ हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर आंभोरे, अकरम शेख, राहूल पाटील यांनी केली.