रिक्षा बसलेल्या वृध्दाला लुटणारा संशयित जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठेत रिक्षात बसलेले एका प्रवाश्याला चार भामट्यांनी लुटल्याची घटना घडली होती. यातील एका संशयितास एमआयडीसी पोलिसांनी आज शनिवारी सकाळी अटक केली.

प्रद्युम्न उर्फ बंटी नंदु महाले (वय २०, रा. पिंप्राळा हुडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित आरोपी बंटी याने तीन जणांच्या मदतीने रिक्षेत बसलेल्या बाबुलाल डिगंबर निंबोरे (वय ७१, रा. बुरहाणपुर) यांना धमकाऊन त्यांच्या खिशातील ४ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. हा प्रकार २० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडला होता. यानंतर निंबोरे यांना रिक्षेतून खाली उतरवुन देत चौघे पसार झाले. या प्रकरणी निंबोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून चौघे संशयित बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी यातील तीघांना अटक करण्यात आली. तर शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे, सुधीर साळवे, चंद्राकांत पाटील यांच्या पथकाने आर. एल. चौफुली परिसरातून बंटी हा संशयितरित्या फिरत असताना त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी बंटी याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content