सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्स फोडून दागिण्यांसह २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील सराफ बाजारातील मनिष ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी दोन लाख ३० हजारांचा एैवज लांबविल्याची घटना मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच सुमारास उघडकीला आले आहे. दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे कैद झाले असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

जळगाव शहरातील गणपती नगर येथील रहिवासी ललीत घिसुलाल वर्मा वय ३६ यांचे सराफा बाजारात भवानी मातेच्या मंदिराजवळ मनीष ज्वेलर्स नावाचे हे सराफा दुकान आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ललीत वर्मा हे दुकान बंद करुन घरी निघून गेले. मंगळवारी ८ नोव्हेंबर रेाजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मनीष ज्वेलर्स दुकानासमोरील कमल ज्वेलर्सचे दुकानदार यांना मनिष ज्वेलर्स दुकानाचे शटर उघडे दिसून आले. त्यांनी तत्काळ मनीष ज्वेलर्सचे मालक वर्मा यांना फोनवरुन घटना कळविली. त्यानुसार वर्मा यांनी दुकानावर पाहणी केली असता, दुकानातून चोरट्यांनी २० हजारांची रोकड व दागिणे असा एकूण २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लांबवून नेल्याचे समोर आले. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही मध्ये तीन चोरटे कैद झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. याबाबत ललीत वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र पाटील हे करीत आहेत.

Protected Content