नागपुरात रेमेडिसिव्हीर इंजेक्शन द्या ; नितीन गडकरींचा कम्पनी मालकाला फोन

 

नागपूर :  वृत्तसंस्था । नागपुरात कोरोना  परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे. त्यांनी कोरोना रुग्णांसाठी रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा पुन्हा देण्यासाठी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली

 

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथे सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो आहे. औषधांचाही तुटवडा निर्माण होतो आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेमेडेसिव्हीर इंजेक्शनसाठी हालचाली केल्या आहेत.

 

 

त्यांनी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे.  रेमेडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावते अशी मागणीसुद्धा सन फार्माच्या मालकाकडे केली. या चर्चेनंतर नागपुरात लवकरच 10 हजार रेमेडिसिव्हीरची इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहे. आजच्या आज  तत्काळ 5 हजार इंजेक्शन सन फार्माकडून दिले जाणार आहेत. उर्वरित 5 हजार इंजेक्शन्स आगामी दोन दिवसांत उपलब्ध करुन दिले जातील.

 

नागपुरात टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत. जवळपास 200 केंद्रांवर ही टेस्ट होते. सोबतच खाजगी रुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.

 

Protected Content