अल्पवयीन मुलीला अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | जळगाव येथील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीला डोंबिवली येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याला दि.१७ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या खबरीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या मुलीला सम्राट कॉलनीतील सचिन गुरुदास पाटील हा पळवून घेवून गेला असून तो सध्या मुंबई येथील डोंबिवली भागात राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, महिला पोलीस कर्मचारी सपना ऐगुंटल्ला यांचे पथक तयार करुन रवाना केले.

सदर पथक मुंबई येथे पोहचल्यानंतर त्यांनी डोंबिवली भागातून मंगळवार, दि.१० मे रोजी पहाटे ६ वाजता सचिन पाटील याच्यासह अल्पवयीन मुलीला ताब्यात असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. संशयिताला बुधवार, दि.११ मे रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता दि.१७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!