जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील किराणा दुकानदाराची तब्बल साडे सहा लाखात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. याबबात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय भालेराव सुर्यवंशी (वय-४३) रा. मौलाना अलिमिया नगर, शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रामनुष किरणा व जनरल स्टोअर्स दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. एप्रिल २०२० मध्ये त्याच परिसरात राहणारा रियाज गुलाब पिंजारी हा संजय सुर्यवंशी यांच्याकडे येवून म्हणाला की, माझ्याकडे कोणताही व्यवसाय नाही, मला किराणा होलसेल भावात देत जा आणि किराणा विक्री करून तुमचे पैसे परत करेल असे सांगितले. लॉकडाऊन असल्याने संजय सुर्यवंशी यांनी रियाज पिंजारी याला उधारीने ४ लाख ५० हजार रूपयांचे किराणा माल वेळोवेळी दिला. त्यानंतर व्यवसाय वाढविण्याचे सांगून संजय सुर्यवंशी यांच्याकडून पुन्हा २ लाख रूपये उसनवारीने दिले. याबाबत संजय सुर्यंवशी यांनी स्टॅम्प पेपरवर देखील त्याच्याकडून लिहून घेतले होते. आणि २ लाख रूपयांची चेक देखील दिला. ९ डिसेंबर २०२१ रोजी संजय सुर्यवंशी यांनी दोन लाखाचा चेक बँकेत टाकला असता तो वटला नाही. याबाबत सुर्यवंशी यांनी पैशांची मागणी केली असता रियाज याने तुला काय करायचे आहे ते कर, मी तुला पैसे देणार नाही असे सांगितले. अखेर याबाबत संजय सुर्यवंशी यांनी शुक्रवारी १५ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रियाज गुलाब पिंजारी रा. शिवाजी नगर जळगाव याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवलदार रविंद्र सोनार करीत आहे.