दोघांकडून तरूणावर चाकूहल्ला; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पोलिस ठाण्यात जायचे असल्याने सोबत जा असे सांगून दोन जणांनी दुचाकीवर नेत तरूणाला पाठ, मान, खांद्या व छातीवर चाकून वार करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी  २ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आसोदा येथील शेतकरी गिरीश रामकृष्ण चौधरी (३५, रा. आसोद) व गावातीलच तीन जणांमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणवरुन हा हल्ला झाला. यामध्ये गावातीलच एका महिलेसह तीन जणांनी चौधरी यांना घरी बोलविले. नंतर पोलीस ठाण्यात जाण्याचे सांगून गिरीश चौधरी याला जळगाव ते आसोदा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ दोघांनी लघुशंकेचे कारण करीत थांबविले. त्या वेळी त्यांनी चौधरी यांच्या पाठ, मान, खांद्या व छातीवर चाकून वार करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते दुचाकी घेऊन पळून गेले.  या प्रकरणी दोन जणांविरोधात जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गणेश सायकर करीत आहेत.

 

Protected Content