सर्वेक्षण : उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका; सपा-बसपा ४२ जागा जिंकणार

up poll

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवारी करत असल्यानंतरही भाजपला मोठा फटका बसत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. उत्तर प्रदेशात बसपा-सपा-आरएलडी महाआघाडीला ४२ जागांवर विजय मिळणार असून भाजपला गतवेळीच्या तुलनेत तब्बल ४० जागांचं नुकसान सोसावे लागणार असून त्यांना भाजपला केवळ ३६ जागांवरच विजय मिळणार आहे. तर काँग्रेसला अवघ्या दोनच जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

एबीपी न्यूज आणि नीलसनच्या सर्व्हेमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे भाजपला ८० पैकी ७३ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी भाजपला केवळ ३६ जागा मिळणार आहेत. त्यामुळे मोदी लाट ओसरली असेच चित्र आहे. उत्तर प्रदेशात भाजपसह बसपा-सपा-आरएलडी या महाआघाडीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधींना सक्रिय राजकारणात आणले होते. परंतु ताज्या सर्व्हेक्षणानुसार यूपीत प्रियांकाची जादू फारशी चालणार नसल्याचे चित्र दिसून आले आहे. अमेठी आणि रायबरेली वगळता काँग्रेसला यूपीत कुठेही विजय मिळणार नाही.

Add Comment

Protected Content