सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी । घरकूल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.

घरकूल प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह इतरांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रमुख संशयित सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळाला नव्हता. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार तब्येत खराब असल्याच्या कारणावरून दादांना तीन महिन्याचा अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला असून या वृत्ताला त्यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडली होती. यामुळे जे.जे. रूग्णालयातील जेल वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णीक यांच्या खंडपीठाने त्यांना अंतरीम जामीन मंजूर केला. यासाठी त्यांना पाच लाख रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच हा जामीन तीन महिन्यांसाठी देण्यात आलेला आहे.

Protected Content