रावेर येथे विक्रीसाठी आणलेले गावठी पिस्तूल जप्त : एकास अटक

raver crime news

रावेर, प्रतिनिधी । येथे गावठी पिस्तूल व जिवंत कडतुस विक्रीसाठी आणणाऱ्या एकास पोलिसांनी सापळा रचून त्याचे वाहन अडवून झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल व दोन जिवंत कडतुसे आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.१९) संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास ही कारवाई करून पिस्तुलासह काडतुसे जप्त करून आरोपीस अटक केली आहे.

 

आरोपी प्रशांत जगन्नाथ सपकाळे याच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तुललासह दोन जिवंत कडतुस व एक हिरो पॅशन-प्रो मोटार सायकल जप्त केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, स्थनिक गुन्हा शाखेला मिळालेल्या गुप्त माहिती वरून आरोपी प्रशांत सपकाळे हा त्याच्या मोटार सायकलने (क्रमांक एम.पी. 68 ; एम.डी. 9683) बऱ्हाणकडून रावेर येथे गावठी पिस्तुल व जिवंत कडतुस विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस मिलिंद सोनवणे, अनिल इंगळे, सुनील दामोदरे, रमेश चौधरी, संतोष मायकल, इंद्रिस खा समशेर खपथन यांनी रावेर-बऱ्हाणपूर रोडवर इसार पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून आरोपीची झडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेले गावठी पिस्तुल व दोन जिवंत कडतुस मिळून आले. पोलिसांनी २० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत कडतुसे व ३५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल जप्त केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या सूचना वरून ही कारवाई केली गेली. पोलीस नाईक मिलिंद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात आरोपी प्रशांत जगन्नाथ सपकाळे, रा. नेपानगर, जि. बऱ्हाणपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content