ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुरेश तांबे

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पारोळा येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची बैठक विभागीय अध्यक्ष राजू जावरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत जळगाव जिल्हा अध्यक्षपदी  सुरेश  तांबे तर कार्याध्यक्षपदी कुंदन बेलदार यांची निवड करण्यात आली.

या बैठकीत स्व. पी. एल. शिरसाट प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा येथील रहिवासी आणि जळगाव तरुण भारत चे प्रतिनिधी सुरेश धनराज तांबे यांची राष्ट्रीय अध्यक्षा चंदा पी. शिरसाठ यांच्या आदेशानुसार विभागीय अध्यक्ष राजू जावरे यांनी केली असून तसे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. तसेच सत्यकाम न्यूजचे कार्यकारी संपादक कुंदन बेलदार यांची जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. ग्रामीण पत्रकार संघाच्या वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

यावेळी विभागीय सचिव भिमराव खैरे, अशोक कापडणे, उत्तर महाराष्ट्र मंगेश पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष फिरोज देशमुख, राकेश जावरे, दयाराम मोरे, आर. टी. सोनार, रमेश पवार, लक्ष्मण लोखंडे सह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सुरेश तांबे व कार्याध्यक्षपदी कुंदन बेलदार यांची निवड झाल्याने त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनपर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Protected Content