जळगाव महापालिकेचे ट्रॅक्टर धक्का स्टार्ट (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 10 at 2.31.08 PM

जळगाव, प्रतिनिधी | अनेक दिवसापासून नागरिकांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होती. ही मागणी लक्षांत घेता महापालिकेने मुख्य रस्त्यांची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आज हेच काम करीत असताना मनपाचे ट्रक्टर भर रस्त्यात बंद पडल्याने मनपाचा गलथान कारभार समोर आला. ते ट्रक्टर सुरु करण्यासाठी दुसऱ्या ट्रक्टरची मदत घेण्यात आली. तसेच धक्का  मारून ट्रक्टर सुरु करावे लागले. यामुळे मनपाची वाहने ही धक्का स्टार्ट झालेली दिसत आहेत. कोटीच्या घरात अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या वाहनांची दुरवस्था  यातून दिसून येत आहे.

आज महापालिका शेजारील गोलाणी मार्केट समोरील रस्त्यावर महापालिकेतर्फे खडीकरण करण्यात आले. हे खडीकरण झाल्यानंतर खडी भरून आणलेला ट्रक्टर दुपारी सुमारे १ वाजेला रस्त्यातच बंद पडला. नेहमीच वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर बंद ट्रक्टर सुरु करण्यासाठी दुसऱ्या ट्रक्टरची मदत घेण्यात आली. यावेळी दुसऱ्या ट्रक्टरच्या चालकाने ट्रालीला मागून धक्का देवून ट्रक्टर सुरु करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दोघी ट्रक्टर रस्त्यावर असुरक्षितपणे उभी होती. यावेळी रस्त्यावरील ये-जा करणारे वाहनचालक या दोघा ट्रक्टरमधून वाहने घेऊन जात होते. सुदैवाने यात कोणती दुर्घटना घडली नाही. महापालिका नादुरुस्त वाहन रस्त्यावर आणून नागरिकाच्या जीवाशी खेळत असल्याची संतप्त भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्यात. वाहनांची दुरुस्ती मनपाच्या वाहन विभागाकडून वेळेवर होत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content