जळगावात सुरभी महिला मंडळातर्फे ‘जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धा’

surbhi mahila

जळगाव प्रतिनिधी । येथील सुरभी महिला मंडळातर्फे (दि.22) रोजी जिल्हास्तरीय भावगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर स्वरश्री चषक विजेती श्रुती वैद्य यांच्या बहारदार भावगीताने स्पर्धेस सुरुवात झाली. परीक्षक म्हणून रेवती ठिपसे, गिरीश मोघे, अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, सचिव मंजुषा राव, श्रुती वैद्य हे मंचावर उपस्थित होते. या स्पर्धेत जळगाव, भुसावळ, पाचोरा, पारोळा, धरणगाव, यावल शहरातील सुमारे 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेतील गीते
नाविका रे, केंव्हातरी पहाटे, केतकीच्या वनी, वारा गाई गाणे, एकाच ह्या जन्मी जणू, या जन्मावर, मावळत्या दिनकर, हस्र नाचरा श्रावण आला, आकाश पांघरूनी जग शांत झोपले, सांग कधी कळणार तुला, अशी अनेक श्रवणीय भावगीते सादर करण्यात आली.

स्पर्धेचा निकाल

लहान गटातून स्वरश्री चषक विजेती, बालगट प्रथम ग्रीष्मा पिंगळे, द्वितीय कवठेकर, तृतीय पूर्वा कुलकर्णी, उत्तेजनार्थ प्रथम सुरभी शर्मा, द्वितीय पियुशा नेवे निवड झाली.  मोठ्या गटातून स्वरश्री चषक विजेती, प्रथम प्रियांका पाटील, द्वितीय स्मृती जोशी, तृतीय रेणुका माळी, उत्तेजनार्थ मयुर हरिमकर तर खुला गटातून प्रथम मनीषा पापरीकर, द्वितीय स्वाती कुलकर्णी आणि तृतीय स्वाती मुळे हे होते.

बक्षीस म्हणून विजेत्यांना लहान गटासाठी ऍड.कै.बापूसाहेब परांजपें (पाचोरा), मोठया गटास ऍड.कै.अ.वा.अत्रे यांच्या स्मरणार्थ रोख बक्षीस, तसेच खुला गट कै.विजया दामले यांच्या स्मरणार्थ बक्षीस तर उत्तेजनार्थ रोख बक्षीस, कै.वसंतराव दत्तात्रय सराफ यांच्या स्मरणार्थ रोख
बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे. सुनीता सातपुते, विनया भावे, मेघा नाईक, ज्योती भोकरडोळे, साधना दामले, शुभांगी पुरणकर, अश्विनी जोशी, संजीवनी नांदेडकर, डॉ. विशाखा गर्गे यांनी सहकार्य केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती कुलकर्णी यांनी केले. तर
सूत्रसंचालन वैदेही नाखरे, नीलिमा नाईक आणि साथीदार भूषण गुरव, अक्षय गजभिये यांनी आभार मानले.

Protected Content