नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रसिध्द एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रदीप शर्मा यांना लखनभैया फेक एन्काउंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. १९ मार्च रोजी त्यांना मुंबई हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता दोन महिन्यापूर्वी प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाकडून त्यांना कायम जामीन मंजूर झाला आहे. प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावली पार पाडली असता प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे आत्मसमर्पण होण्याची अट सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सात दिवसात जामीन प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. याआधी न्यायमूर्ती एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना लखनभैय्या हत्या प्रकरणात सेशन कोर्टानं निर्दोश मुक्तता केली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा निकाल फिरवून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवले होते.
प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या १३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ११ नोव्हेंबर २००६ ला अंधेरीतील सात बंगला येथे फेक चकमक घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. या चकमकीत त्यांनी लखनभैयाची हत्या केली होती. तसेच लखनभैयाची एन्काउंटरमध्ये हत्या झाल्याचा बनाव रचला होता, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी लखनभैयाचे वकील रामप्रसाद गुप्ता यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी सातत्याने कोर्टात युक्तिवाद केला. कोर्टाने या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना 2008 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. पण पुढे कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आले होते.
मुंबई सेशन कोर्टाने या प्रकरणी २०१३ मध्ये ११ पोलीस आणि २१ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यावेळी प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवण्यात आले होते. या निकालाविरोधात वकील रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच इतर ११ आरोपींनी जन्मठेपेच्या शिक्षाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टात या प्रकरणांची एकत्रित सुनावणी पार पडली होती. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच इतर आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.