आरोग्य पथकाला सहकार्य करा : नगराध्यक्षा तडवी यांचे आवाहन

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । कोरोना विषाणूंचे रुग्ण तपासणीसाठी आता प्रत्येक घरातील कुटुंबा असलेल्या सदस्याची आरोग्य तपासणीस नगरपालिकेतर्फे प्रारंभ करण्यात आला. पालिकेचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन इन्फारेड थर्मामीटर तसेच पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी करत आहे. या तपासणी अभियानांस नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी केले आहे.

शहरात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत मदतीसाठी सामाजिक सामाजिक संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्ष नजमा तडवी यांनी केले आहे. पथक शहरातील प्रत्येक घरी भेट देऊन ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करत आहे.

यासह मधूमेह, हृदयविकार, यासह इतर आजारांची माहिती घेण्यात येत आहे..या तपासणीत जर कोरोना विषाणूंची लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोविड सेंटरला पाठवण्यात येणार आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करून योग्य माहिती सांगावी असे आवाहन नगराध्यक्ष नजमा तडवी व मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी दिली आहे.

Protected Content