अमळनेर प्रतिनिधी । येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनिल भाईदास पाटील यांच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारीचे समर्थन करण्यात आले.
येथील राष्ट्रवादी काँग्रस कार्यालय येथे अमळनेर विधानसभा क्षेत्राची येणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा बँक संचालीका सौ तिलोत्तमा पाटील, डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत अनिल पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जोरदार समर्थन करून तेच उमेदवार असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीत बूथ कमेटी सक्षम कशा होतील या बाबतीत चर्चा करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले, जळगाव लोकसभेची उमेदवारी पक्षश्रेष्ठी अनिल भाईदास पाटील यांनाच देतील असा विश्वास जेष्ठ नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील यांनी व्यक्त केला तर अनेक वर्षानंतर लोकसभेची उमेदवारी अमळनेरला मिळत असल्याने अभिमानाची गोष्ट आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितले दि.१२ फेब्रुवारी रोजी अमळनेर विधानसभाक्षेत्राचा बुथ कमिटी मेळावा होणार असून तो यशस्वीपणे कसा होईल याची चर्चा यावेळी करण्यात आली.
या पैठकीत गुलाब कादर पिंजारी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षपदी, अबिद अली सय्यद यांची कार्याध्यक्षपदी व मुशीर शेख गयास शेख यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या बैठकीला पं.स.सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख , महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, शहराध्यक्षा आशाताई चावरीया, जिल्हा उपाध्यक्षा अलका पवार, शिवाजीराव पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील, इम्रान खाटीक, मा.पं.स.सदस्य संदेश पाटील, डॉ.संजय पवार, रणजित पाटील, एल.टी.पाटील, हिंमत पाटील, विकास पाटील, संजय पाटील, भुषण पाटील, युवक तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, विद्यार्थी शहराध्यक्ष सुनिल शिंपी, राहुल गोत्राळ, भैय्यासाहेब पाटील, पंकज पाटील, मुकेश पाटील, जुनैद शेख, भुरा पारधी, संभाजी पाटील, देवीदास देसले, निलेश पाटील, वसंत पाटील, दिपक पाटील, सुनिल पवार, मधुकर पाटील, भुषण भदाणे, मनोहर पाटील, प्रशांत भदाणे, राहुल पवार, महेश पाटील, योगेश भागवत, सनी पाटील, सनी गायकवाड, गणेश पाटील, आशिष पाटील, किरण पाटील, जितु उदेवाल, प्रदिप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.