पोलीस अधिक्षकांच्या हस्ते ४४ जणांचे मोबाईल केले परत (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यातील चोरीस गेलेले ४४ मोबाईल पोलीसांनी शोध घेवून गुन्ह्याची उकल केली आहे. पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते ४४ मोबाईल मुळ फिर्यादींना देण्यात आले.

 

याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी व मोबाईलधारक फिर्यादी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मोबाईल चोरीचे विविध गुन्हे दाखल होते. त्यातील ४४ गुन्ह्यांची उकल करून मोबाईल हस्तगत करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. आज गुरुवारी २४ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याहस्ते मुळे फिर्यादींना त्यांचे मोबाईल देण्यात आले. यात एकुण ४४ मोबाईलांचा समावेश होता.

 

सर्वसामान्य जनतेने न घाबरता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी व पोलिसांनी सुद्धा त्यांनी दिलेल्या तक्रारींचे योग्य निरसन करून त्यांच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण होईल अशी मदत करावी, आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. दरम्यान, मोबाईल परत मिळालेल्या नागरीकांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या मनात पोलिसांविषयी एक विश्वास निर्माण झाला असून चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

 

Protected Content