थोरगव्हाण गावात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

यावल  प्रतिनिधी ।  तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज घडली

शेतकऱ्याच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्युमुळे गावात व परिसरात शोककळा पसरली आहे . भानुदास चौधरी ( वय३८ )  यांनी २ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मनवेल शिवारातील त्यांच्या शेताच्या बांधावरील झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्मह्त्या केली मयताचे चुलतभाऊ अतुल चौधरी यांनी पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस करीत असुन , मयत भानुदास चौधरी यांचे मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी शवविच्छेदन केले चौधरी यांनी आत्महत्या का केली हे मात्र लगेच समजु शकले नाही .

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.