विविध मागण्यांसाठी भाजप शिक्षक आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन

पारोळा, प्रतिनिधी :- शासनाने काढलेल्या शिक्षकांच्या पाल्यांसाठी अर्थसहाय्याचा 16 मार्च 2021 चा अन्यायकारक जी.आर. रद्द करणेबाबत आज दि. ३ सोमवार रोजी भाजप शिक्षक आघाडी जळगाव जिल्हा व पारोळा तालुक्याच्यावतीने तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले आहे. 

शासनाच्या सुधारित जी.आर.नुसार अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर इयत्ता पहिली ते पदव्युत्तर स्तर विहित दराने म्हणजेच रुपये ३ हजार ते ८ हजार अर्थसहाय्य शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळणार आहे. सदरच्या जीआरनुसार ही शैक्षणिक सवलत आजच्या महागाईच्या काळात खूपच तुटपुंजी आहे. म्हणून दिनांक 16 मार्च 2021 चा जीआर रद्द करून पूर्वीचा म्हणजेच 19 ऑगस्ट 1995 चा जी.आर. शिक्षकांच्या पाल्यां साठी लागू करावा.जे शिक्षक समाजाला दिशा देतात राष्ट्र निर्मितीच्या कार्याला हातभार लावतात त्याच शिक्षकांवर व शिक्षकांच्या पाल्यांवर सदरील राज्य सरकारचा जीआरनुसार अन्याय होत आहे. तरी 16 मार्च 2021 चा जीआर रद्द करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे पारोळा यांना देण्यात आले. निवेदन देतांना भाजप शिक्षक आघाडी जळगाव जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी, ईश्वर पाटील, सुभाष पवार, नितीन मराठे, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content