पिंप्राळा हुडको येथील रिक्षाचालकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील भीमनगर येथे रिक्षाचालक अनिल प्रकाश सोनवणे गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, अनिल सोनवणे हे रिक्षाचालक आहेत. ते रिक्षाचालवून आपला उदरनिर्वाह भागवित होते. शनिवारी सायंकाळी ते घरी एकटेच होते. कुटुंबिय कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. यादरम्यान सायंकाळी सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सोनवणे यांचे मित्र देवीदास अरुण सोनवणे हे यांच्यामुळे प्रकार उघडकीस आला. देवीदास सोनवणे यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविले. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी देवीदास सोनवणे यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकात पाटील हे तपास करीत आहेत.

Protected Content