जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे येथील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, गंगाधर योगराज पाटील (वय-४०) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहतो. बांधकाम ठेकेदारीचे काम करून उदरनिर्वाह करतो. गेल्या दोन वर्षांपासून एका दुर्धर आजाराने ग्रासलेले होते. त्यामुळे याला कंटाळून आज रविवार २९ ऑगस्ट रोजी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची उघडकीला आले. याप्रकरणी मयताच्या पश्चात मोठा भाऊ विलास, दोन विवाहित बहिनी असा परिवार होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.