रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्याला सहा महिन्यानंतर रेशन द्वारे वितरीत होणारी साखर प्राप्त झाली आहे. यामुळे नागरीकांचा गुढीपाडवा सण गोळ होणार आहे. साखर प्राप्त झाल्याची माहिती मिळताच गरीब जनतेतुन आनंद व्यक्त होत आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर पासुन अत्यंदोय रेशनकार्ड धारकांना साखर मिळाली नव्हती यामुळे गरीब कुटुंबाच्या ताटातुन गोळवा रुसला होता. वरिष्ठस्तरावरुन साखर प्राप्त होत नसल्याने तालुकास्तरावर साखर मिळत नव्हती. अखेर तहसीलदार बंडू कापसे व पुरवठा निरीक्षक डी. के. पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या प्रर्यत्नामुळे आता तीन महीन्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महीन्याची साखर रावेर गोडाऊनवर प्राप्त झाली असून अजुन यावर्षीची जानेवारी फेब्रूवारी आणि मार्च महीन्याची साखर यायची बाकी आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या साखरेमुळे गरीब जनतेच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.