लाभाच्या विविध योजनांचे १२०० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

 

 

 

रावेर : प्रतिनिधी । रावेर तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांनी दाखल केलेले सजंय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांचे  बाराशे प्रस्ताव  मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत

 

.यामध्ये ऑगस्ट २०२० पासुनचे प्रलंबिल प्रस्तावांचा  आहे. मार्च महीन्यानंतर तहसिल कार्यालयात  बैठक घेऊन पडताळणी करून सगळे प्रस्ताव  मंजूर केले जाणार असल्याचे सजंय गांधी विभागा तर्फे सांगण्यात आले .यामुळे तालुकाभरातील वृद्ध, निराधार, गरीबांचे, अपंग बांधवांचे लक्ष पुढच्या होणाऱ्या बैठकी कडे लागले आहे.

 

रावेर तालुक्यातील गरीब, निराधार, वृद्ध, अपंग बांधवांनी विविध योजने अंर्तगत लाभ घेण्यासाठी तहसिल कार्यलायाकडे अर्ज केला आहे.  ऑगस्ट २०२० पासुनचे विविध प्रस्ताव प्रलंबित  आहे.जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत फक्त दोनशेच प्रस्ताव  मंजूर केले होते. परंतु मागील वर्षा पासुनचे सुमारे बाराशे विविध प्रस्ताव  प्रलंबित आहे.यामध्ये सजंय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना,  अपंग बांधवांच्या विविध योजना प्रलंबीत आहेत .लवकरच  बैठक घेऊन  प्रस्ताव  मंजुरीची   मागणी वृद्ध , अपंग बांधवां मधुन होत आहे.

 

Protected Content