Home Cities जळगाव साखर दरवाढीचा भडका! शिवसेनेचे बिना साखरेचा चहा आंदोलन

साखर दरवाढीचा भडका! शिवसेनेचे बिना साखरेचा चहा आंदोलन

0
9


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सर्वसामान्य जनतेची लूट करून आणि महागाई वाढवून सरकार नक्की कुठला विकास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असा संतप्त सवाल विचारत शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने सरकारच्या कारभाराचा जोरदार निषेध करण्यात आला. महागाईने आधीच होरपळणाऱ्या जनतेवर शासनाने साखर दरवाढ लादून आणखी एक मोठा भार टाकला आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.

साखर दरवाढीच्या या निर्णयाविरोधात आज शिवसेना जळगाव महानगरतर्फे १७ मजली प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. हे आंदोलन जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात पार पडले. आंदोलनादरम्यान शिवसेना महिला आघाडीने प्रशासकीय इमारतीच्या आवारातच प्रत्यक्ष बिना साखरेचा चहा तयार करून सरकारचा अनोख्या आणि तीव्र पद्धतीने निषेध नोंदवला.

या प्रसंगी महापालिकेतील शिवसेना गटनेत्या अर्शिन खाटीक, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमुख घुगे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, महिला आघाडी उपमहानगर प्रमुख नीता सांगोळे आणि माजी नगरसेविका पार्वता भील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, भूषण जोशी, विभाग प्रमुख किरण भावसार, शोएब खाटीक, कलीम खान, शरीफ रंगरेज, निलेश ठाकरे, अमित जगताप, बापू मेने, हर्षल मुंडे, तोसीफ काकर, संजय सांगोळे, सनी जैन, प्रफुल नाईक, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, अशोक गिरणारे, किरण ठाकूर, प्रमोद सोनवणे, डॉ. रमाकांत कदम, अनिल राठोड, महेश शेरे, सावन राठोड, संकेत चव्हाण, ज्योती वंजारी, मनीषा कोळी, विजया पाटील, सुजाता पाटील यांच्यासह शिवसेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound