Home प्रशासन जिल्हा परिषद अचानक सीईओ पोहोचल्या अन् यंत्रणा हादरली! रावेरमध्ये शाळा-आरोग्य केंद्राची थेट तपासणी

अचानक सीईओ पोहोचल्या अन् यंत्रणा हादरली! रावेरमध्ये शाळा-आरोग्य केंद्राची थेट तपासणी

0
4

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवारी, दि. २० ऑगस्ट रोजी रावेर तालुक्याचा दौरा करत वाघोदे व मस्कावद येथील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली. त्यानंतर चिनावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती, स्वच्छता, माध्यान्ह भोजन व्यवस्था तसेच आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

वाघोदे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या आकलनाची आणि शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला.

यानंतर मस्कावद येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतानाच शाळेचा परिसर आणि आवाराची पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनाच्या किचन शेडचीही पाहणी करून भोजन व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत आवश्यक माहिती जाणून घेतली.

दौऱ्याच्या पुढील टप्प्यात करिश्मा नायर यांनी चिनावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. आरोग्य केंद्र परिसरातील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच केंद्रातील औषधसाठ्याची माहिती घेत उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.

ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा कायम उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.


Protected Content

Play sound