Home क्राईम वडगाव येथील जवान प्रमोद पाटील यांचे आकस्मिक निधन

वडगाव येथील जवान प्रमोद पाटील यांचे आकस्मिक निधन


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे येथील सैनिक प्रमोद बाबा पाटील या सैनिकाचे कर्तव्यावर असताना आकस्मिक निधन 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास झाले आहे.

भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे येथील बाबा अर्जुन पाटील यांचे चिरंजीव व अर्जुन झिपरु पाटील यांचे नातू सैनिक प्रमोद बाबा पाटील याचे कर्तव्य बजावत असताना अकस्मात दुःखद निधन झाले आहे.

प्रवीण पाटील हे सैन्यात कलकत्ता येथे नोकरीवर रुजू होते, त्यांचा अंत्यविधी भडगाव सतीचे येथे रविवार रोजी होणार आहे. त्यांचेपश्चात पत्नी, तीन मुली, आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे, त्यांचे अकस्मात निधनाने भडगाव तालुक्यात व परिसरात शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound