पारोळ्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ईपीओ एस मशीन वाटप

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील तहसील कार्यालयात पुरवठा विभागाकडून १२ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेण्यात आली. त्यांच्या मागणीनुसार ईपीओएस मशीन वाटप करून त्यांना त्याबाबत सदर मशीन मध्ये अँड्रॉइड फोर जी सुविधा असून साईड बंदचा विषयच राहणार नाही आणि डोळ्यांचे स्कॅनर, हाताचे बोटांचे ठसे स्कॅनर आणि हे सर्व न झाल्यास ओटीपी सुविधा उपलब्ध होत असल्याचे ट्रेनिंग देण्यात आले.

याप्रसंगी पारोळा तालुक्याचे तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक आर.व्ही. महाडिक, पुरवठा अधिकारी विश्वजीत गिरासे, सहाय्यक संदीप पाटील, भूषण राजपूत, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव मनोहर वाणी, नितीन पाटील, श्यामकुमार पाटील, प्रदीप राजपूत, दिलीप सोनकुळे, भूषण टिपरे, प्रफुल्ल पाटील, दिवाणजी खानोरे, योगेश रोकडे आदी उपस्थित होते. स्वस्त धान्य दुकानदारांचे अगोदरचे मशीन हे फारच जुने व नादुरुस्त झाले होते ते चालत नसताना दुकानदारांना व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे दुकानदारांनी नवीन मशीन मिळावे यासाठी मागणी केलेली असताना आज १२ एप्रिल रोजी पारोळा तहसील कार्यालयात पारोळा शहरासह तालुक्यातील १३० स्वस्त धान्य दुकानदारांना मशीन वाटप करण्यात आले. त्यानंतर सदर मशीन बाबत ट्रेनिंग देण्यात आले.

Protected Content