ऐतीहासीक ‘चांद्रयान-३’चे यशस्वी उड्डाण !

श्रीहरीकोटा-वृत्तसंस्था | भारतीय अवकाश संशोधनाच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा गणल्या जाणार्‍या द्रयान-३या यानाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

 

गेल्या अनेक दिवसांपासून चांद्रयानाच्या प्रक्षेपणाची उत्सुकता लागली होती. आज संपूर्ण देश आणि जगभरातील संशोधकांचे लक्ष या उड्डाणाकडे लागले होते. आज श्रीहरीकोटा येथील डॉ. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून द्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

 

चांद्रयान ३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. भारताची या आधीची म्हणजेच ‘चांद्रयान-२’ ही मोहिम अयशस्वी ठरली होती. या पार्श्‍वभूमिवर ही तिसरी चढाई यशस्वी ठरली असून यामुळे भारतीय अवकाश संशोधनाच्या इतिहासात नवीन अध्यायाची नोंद झाल्याचे मानले जात आहे.

Protected Content