परधाडे येथे बक्षीस वितरण समारंभात वृक्ष लागवडीचा संकल्प

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील परधाडे येथे नवरात्रीनिमित्त नवयुवक दुर्गा मित्र मंडळ व स्व. गायत्री अतुल पाटील यांच्या स्मरणार्थ विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येवून वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.

 

नवरात्रीनिमित्त नवयुवक दुर्गा मित्र मंडळ व स्व. गायत्री अतुल पाटील यांच्या स्मरणार्थ निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, दांडीया रास, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यात विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले.. या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस सोबत एक वृक्ष लागवडी साठी देण्यात आले. या वृक्षाला पुढील वर्षी होणाऱ्या नवरात्रीपर्यंत संगोपन करून वाढवणाऱ्या स्पर्धकांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. स्पर्धकांसोबतच मंडळातील कार्यकर्त्यांनीही वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन स्पर्धक व मंडळातर्फे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी एस. सी. पाटील, गुरूदास पाटील, अतुल पाटील, सागर पाटील, प्रतिक महाजन, प्रशांत पाटील, प्रफुल पाटील, दिगंबर पाटील, राहुल पाटील, राहुल सोनवणे, योगेश महाजन, अतुल महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.

Protected Content