जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केबीसीएनएमयू, जळगावच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या वतीने डॉ. आर. आर. चौहान (मॅनेजमेंट विभाग) आणि डॉ. मुजतहिद अंसारी (एस. एस. बी. टी. इंजिनीअरिंग कॉलेज) यांनी इकरा शिक्षण संस्थेच्या एच. जे. थीम कॉलेज, मेहरून, जळगाव येथे भेट दिली.
या दौऱ्यात महाविद्यालयात चालू असलेल्या तीन महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्सेस – कॅटरिंग अँड हॉटेल मॅनेजमेंट आणि मोबाईल रिपेअरिंग – यांचे यशस्वी मूल्यांकन करण्यात आले. तसेच, या अभ्यासक्रमांबाबत सकारात्मक अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले.
या विशेष प्रसंगी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार साहेब आणि डॉ. इकबाल शाह साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आयेशा बासीत, डॉ. वकार शेख, डॉ. तनवीर खान, डॉ. अमीन काझी, डॉ. उमर खान पठाण आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सहकारी बंधू-भगिनींचेही हार्दिक आभार मानण्यात आले.