विशेष प्राविण्यासह यश! डॉ. अमित राणे यांनी गाठले डॉक्टरेटचे शिखर!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. अमित किरण राणे यांनी डिआर.एन.बी. (सुपर स्पेशालिटी व्हॅस्कुलर सर्जरी) ही डॉक्टरेट परीक्षा विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन जळगावचे नाव रोशन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. अमित यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, व्हॅस्कुलर सर्जरी ही रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि त्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी केली जाणारी अत्यंतspecialized शस्त्रक्रिया आहे. या विषयात डॉक्टरेट मिळवणे हे अत्यंत गौरवास्पद आहे. त्यांनी डॉ. अमित यांचे अभिनंदन करताना, त्यांच्या ज्ञानाचा लाभ खानदेशातील रुग्णांना मिळावा, या उद्देशाने ते दर पंधरा दिवसातून दोन दिवस जळगाव येथे सेवा देणार असल्याचे सांगितले.

डॉ. अमित राणे यांनी आपले एम.बी.बी.एस.चे शिक्षण मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. सध्या ते पुणे येथील प्रतिष्ठित रुबी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते जळगावमधील सुप्रसिद्ध उद्योजक किरण राणे आणि प्रा. डॉ. प्रतिभा राणे यांचे सुपुत्र आहेत. डॉ. अमित यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content