राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत गिरीश पाटील, प्रा.समीर घोडेस्वार, सुष्मित पाटील यांचे यश

जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे ४ मे २०२३ रोजी लाडकारंजा जि. वशिम येथे राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षा घेण्यात आली होती याचा निकाल काल महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन महासचिव डॉ हनुमंत लुगे यांनी नुकताच जाहीर केला.

या राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख गिरीश चंद्रराव पाटील “अ” श्रेणी, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार “ब” श्रेणी, तर शालेय राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू तथा माजी विद्यार्थी सुष्मित गिरीश पाटील “ब” श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे.

यांचेसह जळगाव जिल्ह्यातील प्रा आशिषकुमार चौधरी (वरणगाव) राहुल साळुंखे (चाळीसगाव) सचिन सूर्यवंशी (धरणगाव) योगेश सोनवणे, गिरीश महाजन, नितीन पाटील व विशाल सोनवणे (जळगाव) यांनी यश संपादन केले आहे.
उत्तीर्ण पंचाचे महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव व सचिव योगेश सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content